Views


*उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावा -- आमदार ज्ञानराज चौगुले* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून सध्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालय व औषधी दुकानातील रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा संपलेला आहे. इंजेक्शन साठी रुग्णांचे नातेवाईक यांची मोठी धावपळ होत असून अनेक गंभीर रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची स्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना प्रत्येकी 5 ते 6 डोस इंजेक्शन लागतात मात्र सध्या स्थितीत त्यांना एक डोस मिळणे कठीण झाले आहे, तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी पत्रात केली आहे.
 
Top