Views


*लोहारा शहरातील आत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व आस्थापना बंद करुन विना मास्क फिरणा-यावर दंडात्मक कारवाई*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे आदेश क्र. २०२०/ उपचिटणीस/एमजी/सीआर – २६ दि. ०५.०४.२०२१ रोजीच्या आदेशान्वये नगरपंचायतीच्या वतीने लोहारा बु. शहरात कोरोना (कोव्हीड- १९ ) चा वाढता प्रभाव लक्षात घेता शहरातील आत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. व तसेच विना मास्क फिरणा-या ३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ज्या आस्थापनामध्ये पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास व सोशल डिस्टंन्सचा वापर न करणा-या ३ व्यवसायीकांवर कारवाई करण्यात आली. त्याकरीता नगरपंचायत लोहारा बु. मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदार रणजित शिराळकर, पोलीस कर्मचारी प्रविण नळेगांवकर, लिपीक कमलाकर मुळे, नवनाथ लोहार, श्रीशैल्य मिटकरी, गणेश काडगावे, विलास भरारे, मतीन शेख, मल्लिनाथ बिराजदार, संदीप सातपुते, यांनी कारवाई केली.
 
Top