Views


*निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खास लातूर येथे  राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले*

कळंब (प्रतिनिधी)

जिल्हा नियोजन समितीकडून सहा कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कळंब नगरपालिकेच्या सदस्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे. 

कळंब नगर पालिकेला सन २०२०-२०२१ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून विवीध कामासाठी सहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस चे उस्मानाबाद जिल्हा संपर्क मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी कळंब व नगर पालिकेचे अध्यक्ष सुवर्णा ताई मुंडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, गटनेते लक्ष्मण कापसे, संजय मुंदडा, अमर गायकवाड, महेश पुरी, शकील काझी, उतरेश्वर चांदी, सागर मुंडे आदींनी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शनिवार ता. ३ रोजी जाऊन सत्कार केला आहे. 

कळंब नगरपालिकेला मागील कित्येक वर्षांत लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळत नव्हता. दरवेळी नाममात्र निधी देऊन बोळवण केली जात होती. ही बाब नगराध्यक्ष सुवर्णा ताई सागर मुंडे व तत्कालीन उपाध्यक्ष संजय मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ दोनवेळा जिल्हाधिकारी यांना कळंब नगरपालिकेला घवघवीत निधी देण्याचे निक्षून सांगितले. तसेच संजय जी बनसोडे यांनी सातत्याने जिल्हाधिकारी व पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संपर्क ठेवून प्रत्यक्ष निधी वितरित होईपर्यंत जातीने लक्ष घातले याचा यथोचित परिणाम म्हणजे जिल्हा नियोजन समितीकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेसाठी रक्कम रुपये ३८० लक्ष, दलितेतर वस्ती सुधार योजनेसाठी १५५ लक्ष, नगरोत्थान महाअभियान २७ लाख असे एकूण ५६२ लक्ष रु निधी उपलब्ध करून दिला. यातून शहरातील अनेक उपेक्षित भागातील कामे आता मार्गी लागतील. गेल्या पंचवीस वर्षात किंबहुना जिल्हा नियोजन समिती अस्तित्वात आल्यापासून प्रथमच तब्बल सहा कोटी रुपये कळम नगर परिषदेला निधी मिळाला आहे. या अनुषंगाने संजय जी बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. कळंब नगरपालिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री शंकररावजी गडाख संजय जी बनसोडे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सामाजिक न्याय विभागाचे अर्बत साहेब आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जीवनराव गोरे या सर्वांचे नगरपरिषद मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. 

 
Top