Views


*आजारपणानंतर पहिल्यांदाच भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तब्बल सहा ते सात महिन्यांपासून आजारी असलेले भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दि.8 एप्रिल रोजी सायंकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी झूम ॲप द्वारे संवाद साधला. या संवादातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व मी लवकर आपल्या सेवेसाठी आपल्यात दाखल होत आहे, असे सांगितले. त्यामुळे या संवादात कार्यकर्त्यांमध्ये एक नवचेतना निर्माण झाली. यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या तब्यतेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या संवादात कार्यकर्त्यांना त्यांनी कोविड लसी संदर्भात जनजागृती करण्यास सांगितली व आपण स्वतः व घरच्यांना लस घेण्यास तयार करा यामुळे जनजागृती निर्माण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद मिळेल असे सांगितले. हे महविकासआघाडी सरकार हे वसुली सरकार आहे यांनी जनतेवर अघोषित लॉक डाऊन लादून सर्वसामान्य जनतेचे जे हाल चालू केले आहेत ते जनता कधीही सहन करणार नाही असे सांगितले. या संवादातून साहेबांचा तोच आक्रमकपणा पाहून कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला व सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या बैठकीसाठी प्रामुख्याने भाजपचे नेते तुळजापूर विधानसभेचे आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुध्दीजिवीप्रकोष्ट महाराष्ट्र संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, 
जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, किसान मोर्चो मराठवाडा संयोजक रामदास अण्णा कोळगे, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top