Views


*सलून व्यवसाय पूर्ववत चालू ठेवण्यात यावे -- महाराष्ट्र नाभिक महामंडळ लोहारा तालुका यांच्या वतीने तहसील यांना निवेदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

*महाराष्ट्र नाभिक महामंडळ लोहारा तालुका यांच्या वतीने सलून व्यवसाय पूर्ववत चालू ठेवण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार लोहारा यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ब्रेक द चैन च्या नावाखाली लॉकडाऊन करुन सर्व गोरगरीब व्यवसायकांचे दुकाने बंद केली. यामुळे व्यवसायकांचे खुपच हाल होत आहेत. यामधे प्रामुख्याने नाभिक समाज बांधवां चे सलून बंद आसल्यामुळे कारागीर व सलून चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर सलून दुकाने चालू करावीत, व सर्व वयोगटातील व्यवसायकांना व कारागिरांना कोरोण लस तत्काळ द्यावी, व लॉक डाऊन काळातील आत्महत्या ग्रस्त सलून व्यवसायकांच्या कुटुंबियांना त्वरीत आर्थिक मदत जाहीर करावी, आशी मागणी निवेदनात केली आहे. या वेळी नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष फरीदाबादकर, तालुका आधक्ष गोवींद माने, कल्याण ढगे, अमोल फरीदाबादकर, विजय ढगे, कमलाकर माने, बालाजी माने, धनराज‌ फरीदाबादकर, गणेश जगदिळे, लोखंडे सुरेश, गायकवाड़, दीपक फरीदाबाद,समाज बांधव उपस्थित होते.
 
Top