Views


*कडक निर्बंध घालून छोट्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी -- राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोईनोद्दीन पठाण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कडक निर्बंध घालून छोट्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोईनोद्दीन पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या नवीन परिपत्रकानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड -१ ९ प्रतिबंध करण्यासाठी अनेक छोटे व मोठे व्यवसायीक, खाजगी कोचिंग क्लासेस, हॉल, सलुन, व्युटी पार्लर मंगल कार्यालय तसेच सामाजिक कार्यालय यांना व्यवसायासाठी बंदी घालण्यात आली आहे. सदर व्यवसायीकांनी लाखे रूपयांचा खर्च करुन व्यवसाय उभा केलेला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सादरील परिपत्रकामध्ये अंशतः बदल करून शासनाच्या कोविड - १९ प्रतिबंधाच्या सुचना पाळुन व नियमांध्या अधिन राहुन खाजगी कोचिंग क्लासेस, खानावळ, हॉटेल्स, मंगल कार्यालय, सर्व छोटे, मोठे, दुकाने 50 % उपस्थितीत सुरू करण्याची, ठराविक वेळेत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोईनोद्दीन पठाण, उपध्यक्ष बिलाल रजवी, शहराध्यक्ष नीसार पटेल, कार्याध्यक्ष डाॅ.के.के. बागवान, उपध्यक्ष अँड.मैरान साहेब, पवार, नीसार बागवान, शहेबाज शेख, यांच्यासह व्यवसायिक उपस्थित होते.
 
Top