Views
*श्रीरंग कोळपे यांचे अल्पशा आजाराने निधन*

कळंब (प्रतिनिधी) :

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना असणारी इंग्रजी व गणिताची भीती दूर करणारे शिक्षक श्रीरंग कोळपे वय ७४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कळंब येथील स्मशानभूमीत शनिवार ता. ३ रोजी अंत्यविधी करण्यात आला.
              ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात शैक्षणिक क्रांती निर्माण करणारे एक शिक्षण दूत सन १९६१ पासून ते सन २०१५ च्या आसपास विद्यार्थ्यांकडून फीस ची अपेक्षा न करता खाजगी शिकवणी घेऊन त्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी शिक्षण दिले. 
     अत्यल्प फीसवर गोरगरीब विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण करणारे आधारवड श्रीरंग कोळपे यांचे निधन शनिवार ता. ३ रोजी छातीत दुखत असल्याने त्यांना बार्शी येथील हिरेमठ रूग्णालयात दाखल करण्यात आले असता लागलीच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, नातवंडे असा परिवार आहे. यावेळी सर्व स्थरातील लोक उपस्थित होते
 
Top