Views


*कोरोणा महामारी पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये दि‌.२९मार्च पासून पानपट्टी व चहा चे हॉटेल चालू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली*

कळंब (प्रतिनिधी)

कोरोणा महामारी पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये दि‌.२९मार्च पासून पानपट्टी व चहा चे हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय मा. जिल्हाधिकारी साहेबांनी घेतला होता या निर्णयामुळे गोरगरीब व्यावसायिकांवर व नोकर वर्गावर उपासमारी ची वेळ आली आहे. या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या वतीने कोरोणा प्रतिबंधक नियमावलीतील सर्व नियम पाळत हॉटेल व पानपट्टी व्यवसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची अनुमती द्यावी अथवा 5 एप्रिल पर्यंत असे न केल्यास जेल भरो आंदोलन केले या आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत देण्यात आले हे निवेदन कार्यालयातील खडबडे साहेबांनी स्वीकारले यावेळी भारतीय जनता पक्षाची तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे,मिनाज शेख, हरिभाऊ शिंदे,संजय जाधवर, इम्रान मुल्ला, अशोक क्षीरसागर, सुधीर बिक्कड,नादेर शेख,महेश आडणे, अब्दुल मुलानी,रवी निरफळ,अंकुश कांबळे, अझर मोमीन,तय्यब सय्यद,वैभव घुले, रणजीत भोसले, विशाल वाडे,मोसिन तांबोळी,जुमान चाऊस,व हॉटेल चालक व पान टपरी व्यावसायिक उपस्थित होते. 
Top