Views
*भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद यांच्या वतीने सैनिक सन्मान सोहळा संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शहिद भगतसिंग यांचा हुतात्मा दिवस ते दि. 3 एप्रिल 2021 छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी तसेच फिल्ड मार्षल सॅम माणेकषा यांची जयंती निमित्त संपुर्ण देशभर सैनिक सन्मान कार्यक्रम आयोजित करून भारतीय सैन्याने मात्रभुमिच्या रक्षणासाठी दाखवलेल्या अजोड शौर्य व बलिदान यामुळेच न्यु इंडिया आणि प्रत्येक भारतीयांचा विजय झाला आहे. यावेळी आपल्या मात्रभुमिची रक्षण करण्यासाठी अत्यंत थंड, दुर्गम आणि प्रतिकुल परिस्थितीचा सामना करणा-या आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे स्मरण तसेच समर्थन करत सर्व सैनिकांना नमन केले. यावेळी लडाखचे गलवान खोरे व संरक्षण क्षेत्राचे औद्योगिकरण या विषयावर सखोल चर्चा झाली. तसेच संरक्षण क्षत्राचे औद्योगिकरण करण्यासाठी पावलांन विषयी महिती देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन व अभिवादन करून उस्मानाबाद जिल्हयातील सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा व माजी सैनिकांचा तसेच देशासाठी शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वसंतराव सरडे, बलिभम करवर, दत्तात्रय करवर, परमेष्वर करवर, विठठल गुन्नर, ज्ञानेष्वर भांगे, संतोश सुर्यवंशी, मेजर बोचरे, मेजर जगताप, राजकुमार शिवलकर, माणिक मुसळे, दाजी नलावडे, सुभेदार नेताजी भोसले, शहिद आनंद गेजगे यांचे कुटुंबिय या सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी
 जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिहा राजेनिंबाळकर, माजी सैनिक प्रकोष्ठ संयोजक महाविर तनपुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, शिक्षक जिल्हा संयोजक पांडूरंग लाटेे सर, नगरसेवक अभिजीत काकडे, नगरसेवक प्रविण पाठक, सुनिल पंगुडवाले, सुजित साळुंके, संदिप इंगळे, प्रितम मुंडे, गिरीश पानसरे, आत्मनिर्भर संयोजक सचिन लोढे, एसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसट, राज निकम, जिवन वाठवडे, जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, विद्या माने, गणेष इंगळगी, कुलदिप भोसले, विशाल पाटिल, शंकर मोरे, प्रसाद मुंडे, ओंकार वायकर, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top