Views


*उस्मानाबाद शहरातील विक्रेते-व्यावसायिकांना
जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर फिरून वाटले मास्क*
 
 उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उस्मानाबाद शहर आणि जिल्हयात दिवसेदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जनतेने या साथीला रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा म्हणून जिल्हा व्यापारी महासंघाच्या मदतीने आज शहरातील विविध भागातील भाजी विक्रेते,फळ विक्रेते, विविध व्यवसायिकांना - विक्रेत्यांना आणि मुख्य बस स्थानकांतील प्रवाशांनाही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मास्कचे वाटप केले. या उपक्रमाची सुरूवात शहरातील देशपांडे स्टॅन्डवरील भाजीपाला बाजारातून झाली.त्यांनतर बार्शी नाका,बार्शी रोड, औरंगाबाद रोडवरील फळ विक्रेते, गाडीवाले, ढेलेवाले, ज्यूस सेंटरवाले आणि इतर विक्रेते - व्यसायिक यांना या मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या सोबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती. रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव,उपाध्यक्ष संजय मोदानी, कोषाध्यक्ष धनजंय जेवळीकर आदी सहभागी झाले होते. जिल्हा व्यापारी संघाने सुमारे पाच ते सहा हजार कापडी मास्क उपलब्ध करून दिले होते. जिल्हाधिकारी दिवेगावकर आणि इतर अधिकारी विक्रेते,व्यापाऱ्यांना मास्क घालून कोरोनाचा प्रसार होण्यापासून स्वत:ला वाचवण्याचे आवाहन करत होते. प्रत्येकांना मास्क देऊन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन करत होते. जिल्हाधिकारी यांनी आपणास जिल्हयातील लॉकडाऊन टाळावयाचा असेल तर प्रशासनाच्या उपाययोजनांना जनतेनी साथ द्यावी, स्वत:चे संरक्षण मास्कचा वापर करून, सामाजिक अंतर ठेवून आणि गर्दीत जाण्याचे टाळून करावे, असेही आवाहन केले.





 
Top