Views


*संकेत माने यांचे सेट परीक्षेत यश*                                        

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

बार्शी येथील प्राध्यापक कॉलनीत राहणारे प्रा.धनंजय माने यांचे चिरंजीव संकेत माने हे सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शालेय जीवनापासूनच ते अभ्यासू वृत्तीचे असल्याने त्यांनी अनेक परीक्षेत यश संपादन केले आहे. यात सन २०१९ मध्ये पुणे येथील गरवारे महाविद्यालयातून एम.एस्सी.सूक्ष्मजीवशास्त्र याविषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यांनी सीएसआयआर परीक्षेत नेट-जेआरएफ परीक्षा पास होऊन देशात ७३ वा, गेट परिक्षेमध्ये देशातून ४३४ वा क्रमांक मिळविला व आयसीएआर नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. याशिवाय आयआयटी-जाम ही परीक्षाही उत्तीर्ण झाले होते. नुकतीच डिसेंबर त्यांनी राज्यातील सेट २०२० मध्ये घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षेत (सेट) यश मिळविले. त्यांच्या या यशाबद्ल पुणे येथील आयएफएएसचे प्रा. दादासाहेब सोंडगे, कैलाश चौधरी, गरवारे महाविद्यालयातील प्रा.डॉ.अशोक बनकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. माजी शिक्षणाधिकारी भागवत माने, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालयातील हिंदी पदवी-पदव्युत्तर विभागातील प्रा.डॉ.अशोक बेवले, घारगाव येथील हनुमान विद्यालयातील सहशिक्षक रमेश लोकरे, ज्येष्ठ साहित्यिक उज्वलकुमार माने आदिंनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. 
संकेत माने यांचे विज्ञान शाखेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथून पूर्ण केले होते. त्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. संकेत माने यांचे विविध क्षेत्रातूनही कौतुक होत आहे.
 
Top