Views


*ग्रामपंचायत वार्षिक आर्थिक व्यवहार
अभिलेखे ऑनलाईन अद्ययावत करण्यात
उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात दुसरी*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामापंचायतींनी ग्रामपंचायतीस्तरावरील विविध योजनांचे वार्षिक आर्थिक अभिलेखे ऑनलाईन करुन राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी सर्व ग्रामसेवक,संगणक परिचालक,तालुका व जिल्हा व्यवस्थापक,विस्तार अधिकारी (पं.) गट विकास अधिकारी सर्व आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) नितीन दाताळ यांचे अभिनंदन केले आहे. अकाऊंटींग ऑनलाईन या केंद्रशासनाच्या वेबसाईटवर जिल्हयातील ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग इत्यादी योजनांचे दि.01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतचे दैनंदिन आर्थिक व्यवहार नोंदविले आहेत.हे काम करण्यासाठी डॉ.फड यांनी विशेष पथक स्थापन करुन त्याची जबाबदारी नितीन दाताळ यांच्यावर सोपविली होती.या पथकाने पंचायत समितीस्तरावर ग्रामसेवकांच्या बैठका घेवून प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय नियोजन करुन दैनंदिन आढावा घेवून हे काम वेळेत पूर्ण केले आहे.31 मार्च रोजी जिल्हयातील 622 ग्रामपंचायती पैकी 600 ग्रामपंचायतींनी त्यांचे वार्षिक आर्थिक अभिलेखे ऑनलाईन नोंदविले आहेत.उर्वरित 22 ग्रामपंचायतीच्या केंद्र शासनस्तरावरील तांत्रिक अडचणी जिल्हास्तरावरुन सोडविणे शक्य नसल्याने उस्मानाबाद जिल्हा परिषदेस राज्यात दुस-या क्रमांक मिळाला आहे. कोविड-19 सारख्या परिस्थितीमध्ये सर्व कर्मचारी,अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन आर्थिक अभिलेखे ऑनलाईन करुन राज्यात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ.फड यांनी सर्व ग्रामसेवक,संगणक परिचालक,तालुका व जिल्हा व्यवस्थापक,विस्तार अधिकारी (पं.)गट विकास अधिकारी सर्व व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)नितीन दाताळ यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.तसेच याप्रसंगी विजयसिंह नलावडे,त्यांची राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डॉ.फड यांनी त्यांचा सत्कार केला(पावस्व)अनंत कुंभार,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव सुदर्शन घोगरे,जिल्हा व्यवस्थापक अमर क्षीरसागर व विस्तार अधिकारी संजय कळसाईत हे उपस्थित होते.
 
Top