Views


*मंगलबाई तुकाराम गायकवाड यांचे दुःखद निधन*                         

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

बेटजवळगा ता.उमरगा येथील भीमनगर येथे राहणाऱ्या मंगलबाई तुकाराम गायकवाड यांचे गुरुवारी (ता.१) रोजी दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या होत्या. दुःखाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हळव्या व मनमिळावू स्वभावाच्या असल्याने या परिसरात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्यावरती बेटजवळगा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शुक्रवारी (ता.२) रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लातूर येथील श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या त्या मातो:श्री होत.
 
Top