Views


*पत्रकार सोनवणे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र तर खडके यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार -२०१८ तर उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील सतीश विठ्ठलराव खडके यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार-२०१९ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते सोनवणे व खडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, जिल्हा परिषद सदस्या उषा सर्जे-येरकळ, राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप शिंदे, राजाभाऊ सोनटक्के, कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेटे, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.नामदेव आघाव आदी उपस्थित होते. तर उस्मानाबाद पंचायत समितीच्यावतीने दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात डॉ.विजयकुमार फड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती आशिष नायकल, पंचायत समिती सदस्य प्रदीप शिंदे, संग्राम देशमुख, विराट पाटील, सुधीर करंजकर, बाजीराव पवार, महेश चांदणे, उपसरपंच राम लाकाळ, आण्णा पाटील, किशोर पवार, अमोल नवले आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पी.जी. राठोड, उस्मानाबाद पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी.आर. राऊत, एम.व्ही. चव्हाण (कळंब), एस.जे. दराडे (उस्मानाबाद), बी.ए.राठोड (वाशी), बी.व्ही. शिंदे (भूम), आर.ए. राठोड (परंडा), डी.एल. मुळे (लोहारा), ए.पी. काळे (तुळजापूर) व माशाळकर (उमरगा) आदी उपस्थित होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, कृषी विकास अधिकारी डॉ. टि.जी. चिमनशेटे आदी उपस्थित होते. सोनवणे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था व संघटनेच्यावतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात डॉ.विजयकुमार फड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय तुबाकले, डॉ. टी.जी. चिमनशेटे आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्यावतीने अध्यक्ष अरुण निटुरे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यापूर्वी सोनवणे यांना महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार -२००९-१०, कै.अनंत भालेराव स्मृती विशेष वार्ता पुरस्कार - २०१०, समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार - २०१०, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती राष्ट्रीय कृषि वार्ता पुरस्कार - २०११, महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार २०१२, राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -२०१३, महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार - २०१३-१४, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार - २०१५-१६, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार - २०१७, दर्पणदृष्टी पुरस्कार - २०२० आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोनवणे व खडके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
 
Top