Views


*नियत वयोमानानुसार तुम्ही सेवानिवृत्त झाला आमच्या हृदयातून नाही -- सुधाकर वडगावे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
मुरूम येथील नुतन प्राथमिक शाळेतील सेवक नारायण काळे हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी त्यांच्या सेवेतील ३४ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा शाळेच्या वतीने बुधवारी (ता.३१) रोजी सपत्नीक पूर्ण आहेर करून सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर वडगावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वडगावे बोलताना म्हणाले की, आमच्या भागात आपण एक वेगळे स्थान निर्माण केलात. त्यामुळेच तुम्ही आमच्या प्रशालेतील सेवानिवृत्त झाला पण हृदयातून नाही. यावेळी प्रशालेतील सहशिक्षक पीराप्पा आष्टगे, विलास वराडे, शरणाप्पा घोडके, राजेंद्र सोनवणे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका लक्ष्मी पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर कोरे यांनी केले तर तर आभार रमाकांत माळी यांनी मानले.
 
Top