Views


*वाशी पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्ला पोलिस निरीक्षकासह तीन पोलीस जखमी...*

उस्मानाबाद(प्रतिनिधी)

    वाशी कोठडी दरम्यान एका आरोपीची प्रकृती खालावत याच्या रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाशी पोलीस ठाण्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. वाशी तालुक्यातील पारा येथील रमजा लाला काळे यास वाशी पोलिसांनी एक गुन्हयातील वारंट मध्ये 01 एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते .त्यात न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती .दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्यास उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले .उपचार सुरू असताना त्याचा 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला यावरून त्याचे नातेवाईक संतप्त झाले, मयताचे शव घेऊन आलेली रुग्णवाहिका सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जमावाने शव घेऊन आलेली रुग्णवाहिका ठाण्यासमोर लावली यानंतर या जमावाने ठाण्यात घेराव घालून दगडफेक सुरू केली. यावेळी ठाण्याचे निरीक्षक उस्मान शेख ,कर्मचारी परशुराम पवार, भागवत बोबडे हे बाहेर आले असता, झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले .त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आश्रू धुराच्या सात नळकांड्या फोडल्या तेव्हा जमाव पांगला जखमी पोलिसांना तातडीने वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील निरीक्षक उस्मान शेख गंभीर जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबादला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले .दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिस उपाधीक्षक डॉ. विशाल खांबे वाशीला पोहोचले त्यांनी तपासाच्या सूचना करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.


 
Top