Views
*उस्मानाबाद चे माजी खासदार, माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निरामय हॉस्पिटल, उस्मानाबाद येथे कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद चे माजी खासदार, माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निरामय हॉस्पिटल, उस्मानाबाद येथे कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली. डॉ.पद्मसिंह पाटील यांनी शक्य असतानाही लस घेण्यासाठी सुमारे महिनाभर प्रतीक्षा केली. कालपासुन 45 वर्षे पुर्ण झालेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरु झाले, आणि त्यांनी आमदार राणाजगजितसिंह यांच्यासह लस घेतली. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचे जगभरातील सर्वात मोठे अभियान राबविले जात आहे. कोविड-१९ प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे, वय वर्ष 45 वरील सर्वांनी लस घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी लस घेतल्यानंतर केले.

 
Top