Views


*उस्मानाबाद,कळंब शहरात पोलिसांनी पकडल्या बनावट नोटा एकाला अटक...*


कळंब (प्रतिनिधी)

 शहरात दोन शे पाचशेच्या बनावट नोटा च्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याचे मुख्य कनेक्शन लातूर शहरात असून लाखोंच्या बनावट नोटा चलनात असल्याने मोठी खळबळ माजली आहे .या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे .कळंब शहरात बनावट नोटा चे रॅकेट गेल्या अनेक दिवसापासून चालू होते दोनशे तसेच पाचशे रुपयांचे बनावट चलन बाजारात करू लागल्याने अनेकांना धक्का बसला व व्यापारी ग्राहक संशयाने एकमेकाकडे पाहू लागले. परंतु एका व्यापार्‍याने कळंबचे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांना बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचे गेल्या चार पाच दिवसांपूर्वीच सांगितले पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी मध्यरात्री पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी राऊत, लहांगे अमोल, जाधव कोळेकर, रेखा काळे यांनी आसरफअली तायरआली सय्यद (25 रा. बाबा नगर कळंब )या आरोपीला पळून जात असताना शहरात पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशेच्या तीन व दोनशे रुपयांच्या पाच बनावट नोटा मिळाल्या पोलिसांनी घराची झडती घेतली असता आणखी पाचशे च्या व 200 च्या बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या असून रात्री उशिरा कळम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

बनावट नोटांचा बाजारात सुळ्सुळाट व्यापारी धास्तावले

या बनावट नोटा च्या रॅकेटचे धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे .मात्र यातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नाही .या रॅकेटचे लातूरची कनेक्शन असून मुख्य आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे शहरात लाखोंच्या बनावट नोटा चलनात बाजारात फिरल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहक धास्तावले आहेत.
 
Top