Views


*कोरोना रूग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडीसीवर व तत्सम औषधांचा साठा रोजच्या रोज प्रसिध्द (डॅशबोर्ड )
करण्यात यावा -- भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोना रूग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडीसीवर व तत्सम औषधांचा साठा रोजच्या रोज प्रसिध्द (डॅशबोर्ड )
करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा भाजपा च्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात झालेला दिसून येत आहे. यामध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असे असलेले रेमडीसीवर व तत्सम औषधांचा लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणून वैद्यकीय क्षेत्रात मोठया प्रमाणात वापर केला जातो. मागील आठवडयापासून जिल्हयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांना रेमडीसीवर इजेक्षनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असून ठिकठिकाणच्या औषध विक्रेत्यांकडे सदरच्या इंजेक्षनचा साठा उपलब्धतेबाबत विचारणा होत आहे. उस्मानाबाद जिल्हयाच्या आजुबाजूच्या जिल्हयात औषधांचे उपलब्ध होत नाहीत.शासनाने कोरोना रूग्णांसाठी उपयुक्त रेमडीसीवर व तत्सम औषधांचा साठा उपलब्ध करणे, सुनियोजित वितरण करणे हि जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडे दिली आहेत. परंतू जिल्हयात या औषधाची विचारणा केली असता. औषध कोठे आहे ? किती उपलब्ध आहे ? हे सांगण्यास ते असमर्थता दर्षवित आहेत. याबाबींमुळे रेमडीसीवर अभावी रूग्णांना त्रास सहन करावा लागतो आहे. यासाठी एखाद्याचा जीव धोक्यात जावू शकतो. त्यामुळे सदरच्या औषधांचा काळाबाजार होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तरी प्रशासनास विनंती की, जिल्हयात रोज उपलब्ध असलेल्या रेमडीसीवर व तत्सम औशधांचा साठा कोणत्या औषध विक्रेत्यांकडे, हाॅस्पीटलमध्ये आहे, त्यांचे नाव, संख्या व आगाउ पुरवठा याबाबतचा डॅश बोर्ड जिल्हा अन्न व औषध प्रशा सनाने सुरू करावा व रोजच्या रोज याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जाहीर करावे, जेणेकरून रूग्णांचे व रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होणार नाहीत व औषधांची संभाव्य कमतरते अभावी भितीचे वातावरण निर्माण होणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
 
Top