Views


*कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे जनसामान्यात असलेल्या अस्वस्थता समजून घेवून सर्व सामान्यांना दिलासा देण्यात यावा -- भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे जनसामान्यात असलेल्या अस्वस्थता समजून घेवून सर्व सामान्यांना दिलासा देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रार्दुभाव झालेला आहे. व तो मोठया वेगाने दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. शासनाने दोन दिवसाचा लाॅकडाउन करून स्थिती नियंत्रणात आणू असे जाहीर करून आठवडयातील इतर 5 ही दिवस हे निर्बंध घातल्याचेे दिसून येत आहे. सध्या जिल्हयात कडक निर्बंधाच्या माध्यमातून लाॅकडाउन सृदश्य परिस्थिती निर्माण केली आहे. या सर्व बाबींमुळे जन सामान्यांत मोठया प्रमाणात अस्वस्थता दिसून येत आहे. छोटे व्यापारी, व्यावसायिक, लोककलावंत, हातावर पोट असणारे व्यक्ती, मजुर, रोजंदारीवर काम करणा-या व्यक्तींसह असंख्य लोकांना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. यामुळे जनता शासनाच्या या निर्णयाचा रस्त्यावर उतरून विरोध करण्याच्या मनस्थितीत येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. कडक निर्बंध लावत असताना सर्व क्षेत्रांचा विचार करण्यात आलेला नाही. याचा अनेक क्षेत्राना फटका बसत आहे. 
मागील वर्षापासून कोरोनामुळे सर्वसामान्यांची अर्थिक घडी विस्कटलेली असताना परत एकदा सामान्य जनता आर्थिक गर्तेत पडल्याशिवाय राहणार नाही. हे कडक निर्बंध नसून 1 महिन्याचा लाॅकडाउनच आहे. शब्दांचा खेळ करून लाॅकडाउन असे जाहीर केले. तर सामान्य जनतेला पॅकेज द्यावे लागेल, आर्थिक मदत करावी लागेल, यातून पळवाट शोधण्याच्या नावाखाली शासन कडक निर्बंध लावत आहे असे सर्व सामान्य जनतेला वाटते. किरकोळ विक्रेते छोटे दुकान, छोटे हाॅटेल, सलुन, अभ्यासिका यासह सर्व घटकांचा विचार होण्याची गरज आहे. शासन निर्णयामध्ये समन्वय दिसून येत नाही. जसे की वाहतूक चालू असताना यासंबंधी लागणा-या आॅटोमोबाईल्स गॅरेज, स्पीअर पार्टची दुकाने, आॅईल, ग्रीस, सव्र्हिस दुकाने, पंक्चरची दुकाने बंद आहेत. तसेच 50 व्यक्तींमध्ये लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली आहे. परंतू त्यासाठी लागणारे भांडी, कपडयाची दुकाने, सराफांची दुकाने बंद आहेत. मग लग्न कसे करायचे ? हा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे. बांधकाम करण्यास परवानगी आहे. परंतू त्यासाठी लागणारे बिल्डींग मटेरियलची दुकाने, सिमेंट, स्टील, र्हाउवेअरची दुकाने तसेच इलेक्टाॅनिक दुकाने बंद आहेत. तरी प्रशासनास नम्र विनंती की, आपण लावलेलेे कडक निर्बंध तात्काळ मागे घेवून सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
 
Top