Views


*ब्रेक द चेन च्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने कडक नियमावली करुन लॉकडाऊन सुरु केले आहे, तरी हि नियमावली शिथिल करावी, अन्यथा व्यावसायीक व कामगारांना प्रतिमाह 5 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी -- भाजपा कळंब तालुका*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

देशावर आलेल्या कोरोणा संकट काळात मागील पूर्ण वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले. आत्ताच खूप हाल अपेष्टा सहन केल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरु झाले होते, परंतु महाराष्ट्रात असलेल्या महा विकास आघाडी सरकारने परत एकदा ब्रेक द चैन या गोंडस नावाने कडक नियमावली कडक निर्बंध लादले आहे, तरी हि निर्बंध शिथिल करण्यात यावे, अन्यथा व्यावसायीक व कामगारांना प्रतिमाह 5 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा कळंब तालुका यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 
या कडक निर्बंधांमुळे सर्व व्यापारी व गोरगरीब मजुर वर्ग खुप अडचणीत आला आहे. हातावर पोट असलेले छोटे व्यावसायीक फेरीवाले, न्हावी, मजुर, इत्यादींच्या रोजी रोटी चा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण विक एणड लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याप्रमाणे शनीवार, रवीवार, बंद ठेवून इतर दिवशी सर्व बाजारपेठा कोरोनाचे नियम पाळुन चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, शहराध्यक्ष रोहित कोमटवार, संजय जाधवर, शिवाजी शिरसाट, किशोर वाघमारे, नारायण टेकाळे, आबा रणदिवे, भैय्या बाविकर, जीवा कुचेकर, प्रवीण यादव, बाबुराव शेंडगे, इम्रान मुल्ला, सतपाल बनसोडे, श्रीकृष्ण शिंदे, शिवाजी गिड्डे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top