*कोरोनाच्या दुसऱ्या लाटे ची रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या माध्यमातून जनजागरण मोहिमेची सुरुवात*
कळंब(प्रतिनीधी)
सध्या कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे वाढताना दिसत आहे पण लोकांमध्ये मनावे तेवढे गांभीर्य दिसून येत नाही. यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या माध्यमातून जनजागरण मोहिमेची सुरुवात कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पुरूषोत्तम पाटील, रोटरीचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. भगवंत जाधवर, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. राजेंद्र बावळे, रोटरी सचिव डॉ. सचिन पवार यांच्या हस्ते शुक्रवार ता. २ रोजी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोटरीचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी कोरोना चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी व लसीकरण मोहीम वाढण्यासाठी रोटरी विविध उपक्रमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व याची सुरुवात "मास्क शिवाय प्रवेश नाही" याचे बॅनर कळंब शहरातील दुकानांमध्ये लावून करत असल्याचे सांगितले व लोकांनीही आपले आरोग्य आपल्याच हातात याची जाणिव ठेऊनच वागावे असे आवाहन केले. या बॅनर चा लोकार्पण सोहळाही मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
परमेश्वर पालकर सरांनी मनोगतामध्ये सद्य परिस्थितीचे अवलोकन करून रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.पुरूषोत्तम बाराते पाटील यांनी जास्तीत जास्त लोकांनी मनामध्ये कसलीही भीती न ठेवता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटे. श्रीकांत कळंबकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी याचे प्रोजेक्ट चेअरमन रोटे. हर्षद अंबुरे,रोटे. संजय देवडा, रोटे. संजय घुले, रोटे.डॉ. अनिगुंठे सर, रोटे.डॉ. एच. एल. चौधरी सर, रोटे.निखिल भडंगे यांनी परिश्रम घेतले.