*ब्रेक द चेनच्या नावाखाली सुरु असलेल्या लॉकडाऊन ची नियमावली शिथिल करावी, अन्यथा व्यावसायीकांना व गोर गरीब जनतेला प्रतिमाह 5000 रु नुकसान भरपाई देण्यात यावी -- भाजपा लोहारा तालुका*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
ब्रेक द चेनच्या नावाखाली सुरु असलेल्या लॉकडाऊन ची नियमावली शिथिल करावी, अन्यथा व्यावसायीकांना व गोर गरीब जनतेला प्रतिमाह 5000 रु नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने महाराष्टात ब्रेक द चेनच्या नावाखाली कडक लॉकडाऊन चालु केले आहे. यामुळे सर्व व्यापारी व गोरगरीब जनता अडचणीत सापडुन यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सरकारने दोन दिवसाचा लॉकडाऊन करुन स्थिती नियंत्रणात आणु असे जाहिर करुन आठवड्यातील दोन दिवस ब्रेक चेनच्या नावाखाली कडक निर्बंध लावुन लॉकडाऊन सुरु केले आहे. या कडक निर्बंधांमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, लोककलावंत, हातावर पोट असणारे व्यक्ती, सलुन, मजुर, अॅटोमोबाईलस गॅरेज, स्पेअरपोर्ट चे दुकाने, अॉईल, ग्रीस, सर्व्हिस दुकाने, पंमचर दुकाने, बिल्डिंग मटेरियल दुकाने, सिमेंट, स्टील, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद असल्याने यांच्या रोजी रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने लावलेले निर्बंध शिथिल करुन सर्व बाजारपेठा कोरोनाचे नियम पाळुन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कल्याण ढगे, संतोष फरीदाबादकर, अदि, उपस्थित होते.