Views





*अणदुर येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता, यामधील दोन आरोपीं अटक झाली असून, यामधील एक आरोपी फरार आहे, या आरोपीला लवकर अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवती व महिला अघाड़ी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे दि.27/01/2021 रोजी अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला, या प्रकरणातील दोन आरोपींना अटक झाली असून, यामधील एक आरोपी हा अद्यापही सापडलेला नाही. तरी या आरोपीला लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता युवती व महिला अघाड़ी यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय समोर दि.9 मार्च 2021 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. आरोपीस लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 15/03/2021 रोजी तीव्र उपोषण करण्यात येईल, असा ईशारा भारतीय जनता पार्टीच्या महिला व युवती पदाधिकारी तसेच पिडीत मुलीच्या आई - वडिलांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात सहभागी पिडीत मुलीचे आई - वडील, भारतीय जनता महिला जिल्हा उपाध्यक्ष अंजलीताई वेताळे, युवती जिल्हाअध्यक्ष पुजाताई देडे, युवती जिल्हा सरचिटणीस पुजाताई राठोड, युवती जिल्हा सरचिटणिस देवकन्याताई गाडे, युवती शहराध्यक्ष धनश्रीताई, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, प्रभाकर मुळे, पांडुरंग लाटे, ओम नाईकवडी, प्रविण पाठक, सुजित साळुंखे, विनोद निंबाळकर, जीवन वाठवडे, गिरष पानसरे, दादुस गुंड, आदि उपस्थित होते.
 
Top