Views


*श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*   

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
                        
मुरूम येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे यंदाचे १२ वे वर्ष सुरू असून कोरोनामुळे सन २०१९-२० ची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २२) रोजी कोरोना नियमांचे पालन करून ज्ञानदान विद्यालयात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य दत्तात्र्य इंगळे, येणेगूरचे मुख्याध्यापक संगाप्पा बादोले, डॉ.महेश मोटे, मल्लीनाथ सुपतगावे, संस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, संचालक श्रीशैल बिराजदार आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख म्हणून बोलताना प्राचार्य दत्तात्र्य इंगळे यांनी संस्थेच्या वाटचालीमध्ये संचालक व सभासद यांचे महत्त्वपूर्ण संबंध असून केवळ ग्राहकांच्या विश्वासावरच पतसंस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना वरनाळे म्हणाले की, या पतसंस्थेला उत्कृष्ट संस्था चालविल्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून विभागीय पातळीवर सलग दोन वर्षापासून पतसंस्थेला पुरस्कारांने सन्मानित केले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस ३९ लाख १४ हजार ३५३ रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून या पतसंस्थेकडे यंदा ९२ लाख ९७ हजार ६०० रुपयाचे वसुल भाग भांडवल, ६ कोटी ७१ लाख ६१ हजार २३६ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ५ कोटी ९२ लाख १८ हजार ५१४ रुपयाचे कर्ज वाटप केले. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ५९ लाख ८६ हजार ६७६ रुपये असून या संस्थेचे ३४५६ सभासद, ऑडीट वर्ग 'अ' दर्जा प्राप्त, संपूर्ण संगणकीकृत, आयएफसी कोड, इंटरनेट बँकींग सुविधा उपलब्ध असणारी सेवाभावी पतसंस्था असून ठेवीवरील आकर्षक व्याजदर योजना यामध्ये महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र (मुरुम व उमरगा), सोने तारण कर्ज तर इतर तारण कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायदयासाठी संस्थेकडून पुरविल्या जात असून अल्पावधीत संस्थेच्यावतीने सार्वजनिक वाचनालय व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. संस्थेची तीन मजली इमारत पूर्णत्वाकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे, व्यवस्थापक दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, विनायक मुदकण्णा, अमर बाबशेट्टी, युवराज शिंदे आदींसह कर्मचारीवृंद व सभासद आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी केले तर आभार मनिष मुदकण्णा यांनी मानले.
 
Top