Views


*शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उमरगा येथे बैठक
देशातील तज्ञांचे होणार मार्गदर्शन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शांतिदूत परिवारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी उमरगा चौरस्ता येथील ओम मंगल कार्यालय लॉन्स येथे शनिवारी दि.27 मार्च 2021 रोजी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सेवानिवृत्त केंद्रीय सचिव केशव कांबळे व शेतकरी बाजारपेठ संकल्पक विजय दुबे हे उपस्थित राहुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व शेतीतील पिकविलेल्या मालास बाजारपेठ मिळवुन देणे व शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पन्नात वाढ करण्यासंबंधी मार्गदर्शन होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शांतीदूत परिवाराचे कार्यकारी अध्यक्ष उमेश जाधव, मराठवाडा अध्यक्ष जीवन जाधव, प्रदेश सरचिटणीस प्रा.युसुफ मुल्ला, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, सचिव गणेश गरुड, कोषाध्यक्ष संतोष जाधव, आदींनी केले आहे.
 
Top