Views


*महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे अचानकपणे लाईट बंद केलेली आहे, ती पुर्वरत चालु करणे शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी*

 उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन अचानक पणे लाईट बंद करून अडचणीत आणले आहे, तरी हि वीज कनेक्शन त्वरित चालू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची लाईट अचानकपणे बंद केलेली आहे. 2020 च्या विज बिलानुसार जुने बिल गोठवण्यात आलेले आहे. त्याच्यावर व्याज किंवा आकार लागणार नाही असे असताना ज्या शेतकऱ्यांचे विज बिल थकीत असल्यास त्याला पंधरा दिवसाची नोटीस अगोदर देणे व दिलेल्या नोटीसचे उत्तर योग्य वेळेस दिल्यास त्याच्यावर चर्चा करून 2020 च्या पत्रकाअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्यांचे विज कनेक्शन व विज खंडित करू नये असे असताना हुकुमशाही प्रमाणे शेतकऱ्यांची विज वितरण कंपनीने अचानक लाईट बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे विज चालू करून सहकार्य करावे, अन्यथा दि. 01/04/2021 वार गुरवार रोजी सोलापूर - औरगाबाद हायवे वर सरमकुंडी फाटा येथे सकाळी 10 वाजता रस्ता रोखो आंदोलन करण्यात येईल, याच्यात काही बरेवाईट झाल्यास किवां नुकसान झाल्यास याची जिम्मेदारी विज वितरण कंपनीवर राहील असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर शेतकरी संघटनेचे चंद्रकांत भराटे, विलासराव देशमुख, शाहुराज माने, जगन्नाथ घुले, भास्कर कवडे, इत्यादींच्या, स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top