Views


*उस्मानाबाद जिल्हयात उर्दू माध्यमातून एकमेव मंजूर असलेल्या गुंजोटी येथील उर्दू हायस्कूलच्या अटल टिकरींग लॅबचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंब लॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी मिळाली आहे, यामुळे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना मिळेल, विद्यार्थ्यांनी विज्ञान व आध्यात्म यांची सांगड घालत व नवनवीन बदलते तंत्रज्ञान स्वीकारत शिक्षितच नव्हे तर सुसंस्कारित व्हावे असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. उस्मानाबाद जिल्ह्यात उर्दू माध्यमातून अटल लॅब करिता एकमेव शाळेची निवड झालेल्या गुंजोटी (ता. उमरगा) येथील उर्दू हायस्कूल मध्ये उभारण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब’चे उद्घाटन आमदार चौगुले यांच्या हस्ते शनिवारी दि.27 मार्च 2021 रोजी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहियोद्दीन सुलतान होते. तर प्रमुख म्हणून युवा नेते किरण गायकवाड, मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेबूब सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, गुंजोटीचे सरपंच सरस्वती कारे, आदि, उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आधुनिक प्रयोगशाळेद्वारे थ्रीडी प्रिंटरपासून रोबोसह आवश्यक विविध साहित्य, उपकरणे बसविण्यात आली आहेत. या प्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष युनूस पटेल, सचिव उस्मान सय्यद, सहसचिव मुहिब मुन्शी, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक आबीद पटेल, उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक युनूस शेख, केंद्रप्रमुख सुभाष चव्हाण, श्रीकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवानंद बुदले, उप सरपंच आयुब मुजावर, पोलिस पाटील नाजर देशमुख, सर्व 
ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हैदर मुजावर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आबीद पटेल यांनी मानले.

 
Top