Views*नागराळ, हिप्परगा रवा रस्त्यावरील पूलाचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण, या पुलामुळे शेतकऱ्यांची व नागरीकांची गैरसोय दुर, यासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये निधी देण्यात आला होता*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लोहारा तालुक्यातील नागराळ लो ते हिप्परगा रवा रस्त्यावरील पुलाच्या कामाचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दि.12 मार्च 2021 रोजी लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, शिवाजी कदम, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, न.प‌.गटनेते अभिमान खराडे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राजेंद्र भोजने, शहर प्रमुख सलीम शेख, तलाठी जगदीश लांडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सरपंच रितु कुलदीप गोरे, उपसरपंच गुंडु जाधव, ग्रामसेवक पी.डी‌.शिनगारे, महेबुब गवंडी, सरपंच राम मोरे हिप्परगा रवा, पोलीस पाटील तानाजी माटे, सोपान शिंदे, सत्यनारायण गोरे, बाबुराव घाडगे, बळीराम गोरे, प्रेम लांडगे, कुलदीप गोरे, तेजाबाई कोळी, किरण चिंचोले, पांडुरंग पवार, विश्वनाथ गोरे, रत्नाजी माटे, बळीराम गोरे, आदि, उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील नागराळ लो -- हिप्परगा रवा रस्त्यावरील ओढ्यावर पुल नसल्याने शेतकऱ्यांची व नागरीकांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. हा पुल मंजुर करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी व नागरीकांनी आ.ज्ञानराज चौगुले यांच्याकडे केली होती. यांची गैरसोय लक्षात घेऊन आ. ज्ञानराज चौगुले यांनी या कामासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी मंजुर करुन दिला होता. या निधीतून पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांची व नागरीकांची गैरसोय दुर झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top