*उमरगा लोहारा तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी ४२ कोटी रुपये निधी मंजुर, आ.ज्ञानराज चौगुले यांची माहिती*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
उमरगा लोहारा तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.
यामध्ये,
१) गुंजोटी मोड ते उमरगा ते रामा २३९ रस्ता (रा.मा.२४०) ची सुधारणा करणे - एक कोटी ५० लक्ष रुपये.
२) सास्तुर चौक ते तालुका सरहद्द (रामा २३७) रस्त्याची सुधारणा करणे. - तीन कोटी ७५ लक्ष.
३) बोरी मोड ते नाईचाकूर व कोळेवाडी ते राज्य सरहद्द (रामा २३७) रस्त्याची सुधारणा करणे. - ८० लक्ष रुपये.
4) लोहारा गाव ते विलासपूर पांढरी (रामा २११) रस्त्याची सुधारणा करणे. - चार कोटी ३० लक्ष रुपये.
५) विलासपूर पांढरी ते आष्टा मोड (रामा २११) रस्त्याची सुधारणा करणे. - चार कोटी रुपये.
६) तावशीगड ते तालुका सरहद्द (रामा २४२) रस्त्याची सुधारणा करणे - ९८ लक्ष रुपये.
७) आष्टा मोड ते अचलेर (रामा २११) रस्त्याची सुधारणा करणे. - चार कोटी रुपये.
८) सास्तुर गावाजवळील पुलाकरिता जोडरस्ता करणे. - ८० लक्ष रुपये.
९) रामा २११ रस्त्यावर धानोरी गावात सिमेंट रस्ता करणे व व्ही. एच. पी. ची पुनर्बांधणी करणे, ता.लोहारा - दोन कोटी रुपये
१०) रामा २३७ जंक्शन ते चिरेवाडी मोड, माडज गावाजवळ, गुगळगाव मोड ते कोरेगाव, मीनाक्षी मंगल कार्यालय ते उमरगा, बेडगा ते मानेगोपाळ, प्रजिमा ५१ रस्त्याची सुधारणा करणे. - चार कोटी ४५ लक्ष.
११) कसगी गोडाऊन ते रामा २३९ जंक्शन, कर्नाटक सरहद्द ते डिग्गी प्रजिमा ३७ रस्त्याची सुधारणा करणे. - एक कोटी ५० लक्ष.
१२) राष्ट्रीय महामार्ग ६५ ते डाळिंब रस्त्याची (प्रजिमा ४७) ची सुधारणा करणे. - ५२ लक्ष रु.
१३) रामा २४० मुळज त्रिकोळी ते जिल्हा सरहद्द रस्ता प्रजिमा ५० मधील लहान पुलांचे बांधकाम करणे. - एककोटी रुपये.
१४) कास्ती ते लोहारा रस्त्याची (प्रजिमा ४१) ची सुधारणा करणे. - तीन कोटी रुपये
१५) धानुरी ते हराळी व तोरंबा ते सालेगाव रस्ता प्रजिमा ४४ रस्त्याची सुधारणा करणे - तीन कोटी ४० लक्ष रुपये
१६) देवबेट ते धानुरी रस्ता प्रजिमा ४५ ची सुधारणा करणे. - 1 कोटी 52 लक्ष रु.
१७) प्रजिमा ५१ वरील बेडगा गावाजवळील पुलांची पुनर्बांधणी करणे. - एक कोटी ७२ लक्ष रुपये.
१८) प्रजिमा ४१ वर हिप्परगा रवा गावाजवळ लहान पुलाची बांधणी करणे. - दोन कोटी रुपये.
अशा एकूण १८ रस्त्यांच्या सुधारणेसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार सदर निधी मंजूर झाला असून याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहेत.