Views

*लोहारा येथील शीतल कारले यांनी कुस्ती पंच प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले असून उस्मानाबाद जिल्ह्यातील त्या पहिल्या प्रशिक्षित कुस्ती पंच होण्याचा बहुमान मिळवला*



उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मल्लविद्या कुस्ती महासंघ यांच्या वतीने कराड (जि. सातारा) येथील संजय पाटील कुस्ती केंद्र येथे हे कुस्ती पंच प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १२ व १४ मार्च तीन दिवसीय हे प्रशिक्षण घेण्यात आले. मल्लविद्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष गणेश मानगुडे व हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रेम अकोले यांनी प्रशिक्षण दिले. लोहारा तालुक्यातून मल्लविद्या कुस्ती महासंघाचे तालुकाध्यक्ष पैलवान रामेश्वर कारले व शीतल कारले या दोघांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. कारले दांपत्याने यशस्वी रित्या कुस्ती पंच प्रशिक्षण घेतले.
 या दोघांचेही मल्लविद्या कुस्ती महासंघाचे लोहारा तालुका कार्याध्यक्ष आनंद साळुंखे, प्रसिद्ध उद्योजक भागवत बनकर, मल्लविद्या कुस्ती महासंघाचे विभागीय अध्यक्ष गोविंद घारगे, पोलीस पाटील संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत पाटील, तालुका प्रवक्ता तानाजी माटे, संपर्कप्रमुख महेश कुंभार, सुरेश माने,अरुण कुंभार, सतीश पाटील, छत्रपती कामगार संघटनेचे विभागीय सचिव बालाजी माटे यांनी अभिनंदन केले.
 
Top