*घरोघरी जाऊन शिकविण्याचा उपक्रम"शाळा बंद शिक्षण सुरू"*
कळंब (प्रतिनिधी)
शाळा बंद शिक्षण सुरू हे ब्रीदवाक्य घेऊन नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 कळंब मधील शिक्षकांनी कोरोना काळातील घरोघरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
इयत्ता पहिली ते चौथी वर्ग बंद असल्याने या शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शाळेतील गणित,मराठी व इंग्रजी साहित्य गणित अभ्यासासाठी दिले असून त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणीही ते घरी जाऊन सोडवत आहेत. त्यामुळे प्रत्येक घर शाळा बनत असल्याचा आनंद विद्यार्थी व पालकांना होता आहे. शिक्षणाचे साहित्य मिळाल्याचा आनंद ुलांच्या चेहर्यावर दिसत आहे यामुळे या शाळेतील शिक्षक ही समाधानी असल्याचे पायाळ यांनी सांगितले यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रेजा पायाळ यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत घरीच शाळा सुरू झाल्याने मुलगी आनंदात आहेत या नवीन उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

