Views


*उस्मानाबादच्या महिला फौजदार हिना शेख करतात प्राण्यांसह वयोव्रद्दांची सेवा!*

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद 
उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्याच्या फौजदार हिना शेख यांनी खाकी वर्दीतील माणुसकी जपत एक महिला दिना निमित्ताने जनतेला वेगळा संदेश दिलाय. 
उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्यात एक महिला फौजदार आहेत त्यांच नाव हिना शेख अस आहे.
त्या मुळच्या औरंगाबादच्या आहेत त्या पोलीस खात्यात उस्मानाबाद जिल्ह्यात रुजु झाल्या प्रथम त्यांना नळदुर्ग पोलीस ठाण्यात फौजदार पदावर काम करण्याची संधी मिळाली.
त्या शैक्षणिक जिवनापासून समाजसेवा करयास ईछुक होत्या त्यांना पोलीस खात्यात नौकरी लागल्यामुळे त्यांचा थेट जनतेशी संपर्क व्हायला सुरवात झाली.
येवढ्यातच त्यांची नळदुर्ग ठाण्यातुन उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्यात बदली झाली.
दरम्यानच्या काळात कुरोनाचे संकट ओढावले त्यामुळे रसत्यावर भठकत आसणारे वयोव्रद्ध ,मनोरुग्णांची उपासमार होत असल्याचे हिना शेख यांच्या नजरेस आले त्यांनी कसलाही विचार न करता येडशी येथील ब्रीज खाली दोन वयोव्रद्दांची ,पार्डी फाटा येथील लोक ,व लाकडाऊन मध्ये पायी चालत जाणांर्या नागरीकांनाही अन्नदान केले हे सर्व स्वताच्या घरातून जेवणाची व्यवस्था करुन त्यांना आधार दिला.येवढेच नाही तर येडशीच्या डोंगरात माकडेही उपाशी राहत होती त्यांनाही स्वखर्चातून फळे व अन्न देत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हि खाकी वर्दीतील माणुसकी जपणारी पहिलीच महिला आहे.त्यामुळे अशा महिलांचे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन कौतुक करणे हे वावग ठरणार नाही.तसेच शेख यांनी अनेकांचे होणारे संशयामुळे कौटूंबीक वाद यावर पति पत्नी या दोघांचे समुपदेशन करुन शेकडो संसार बसवले आहेत.
या महिला फौजदार हिना शेख यांच्या या कार्याला सँल्यूट.
 
Top