Views


*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पं.स. लोहारा अंतर्गत कास्ती खु येथील प्रधान मंत्री आवास योजनेतील लाभार्थींचा गृह प्रवेश सोहळा संपन्नन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
पंचायत समिती लोहारा अंतर्गत लोहारा तालुक्यातील कास्ती खु येथे प्रधान मंत्री आवास योजनेतील लाभार्थीचा गृह प्रवेश सोहळा पार पडला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाभार्थी रावसाहेब अप्पा भुजबळ यांची सुन रूक्मिणीबाई भुजबळ यांना वृक्ष देवुन सत्कार करून गृह प्रवेश करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, सरपंच सागर पाटील, ग्रामसेवक बापु जट्टे, पं.स.अभियंता परवेज सय्यद, संदीप पसारे, आदि उपस्थित होते.
 
Top