Views


*जिल्ह्यातील २९ मार्चचते १५ एप्रिल पर्यंत शाळा, ट्युशन महाविद्यालये बंद*


उस्मानाबाद (प्रतिनिधी)

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात 29 मार्चच्या रात्री बारा वाजेपासून 15 एप्रिल पर्यंत काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा, ट्युशन आणि महाविद्यालय, चहाची दुकाने, पान,तंबाखू सिगरेट विक्री करणाऱ्या पानाच्या टपऱ्या, खाजगी क्लासेस , शिकवण्या , प्रशिक्षण संस्था वस्तीग्रह , खेळाची मैदाने , क्रीडांगणे , जिम व्यायाम शाळा हे 15 एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय फंक्शन हॉल आठवडी बाजार 15 एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत पाच हजार भाविकांना मास्क घालूनच प्रवेश दिला जाणार आहे. विना मास्क आढळणाऱ्या नागरिकास पाचशे रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे..
 
Top