Views
*भारतीय जनता पार्टी कळंब तालुक्याच्या वतीने,महावितरण कार्यालयासमोर लाईट बिल ची होळी करून आंदोलन करण्यात आले*

कळंब (प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी कळंब तालुक्याच्या वतीने,महावितरण कार्यालया कळंब च्यासमोर महावितरण चे अभियंता पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले, सक्तीची वीज बील वसुली थाबवणे,कोरोना काळातील वीज बिल माफी ,कृषी साठी योग्य दाबाने चोवीस तास वीज पुरवठा मिळावा, तोडणी केलेले कनेक्शन त्वरीत जोडणे, पाण्यासाठी होत असलेले नागरिकांचे व जनावरांचे हाल थांबवण्या साठी महाविकास आघाडी सरकार विरोधात वीज बिलांची होळी करण्यात आली व वसुली सरकारचा निषेध करण्यात आला .
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे,रामहरी शिंदे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित कोमटवार, हरिभाऊ शिंदे,कोल्हे अण्णा,बाबुराव शेंडगे,शितल चोंदे,गोपाळ चोंदे, वेदपाठक विश्वजीत हरिश्चंद्र,इम्रान मुल्ला, अशोक क्षीरसागर, गोविंद गायकवाड,व कळंब तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

 
Top