Views
*महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरात व तालुक्यातील भोसगा येथे विज बिलाची होळी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
सक्तीची वीज बील वसुली थांबवण्यात यावी, कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात यावेत, कृषी साठी योग्य दाबाने 24 तास वीज पुरवठा मिळावा, तोडणी केलेले कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावेत, पाण्यासाठी होत असलेले नागरीकांचे व जनावरांचे हाल थांबवण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरात व तालुक्यातील भोसगा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विज बिलाची होळी करुन या सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, काशिनाथ मानाळे, अनिल आडे, प्रसन्न एकुंडे, अप्पाराव पाटील, महेश राठोड, यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top