Views


*सामुहिक बलात्कार करुन फरार झालेल्या अणदूर येथील आरोपीस बेडया ठोका -- भाजयुमोची मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 सामुहिक बलात्कार करुन फरार झालेल्या अणदूर येथील आरोपीस बेडया ठोका, अशा मागणीचे निवेदन उस्मानाबाद 
भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीवर दि. 27/01/2021 रोजी सामुहिक बलत्कार करण्यात आला आहे. अत्याचार करणारे 30 वर्षीय युवक असून त्यापौकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या गुन्ह्यातील 1 आरोपी अद्याप फरार आहे. पिडीत मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आणखीन ही दबावात आहेत. त्यांचे जीवन हे अतिशय कठीन झाले आहे. सदरील फरार आरोपीस पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर शोध लावून त्याला बेडया ठोकाव्यात व पिडीतेला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर तसेच महिलांवरती गेल्या कांही दिवसापासून अन्याय व अत्याचारात मोठया प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. या कडे पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याचे दिसून येत असून जन सामान्य लोकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा कागदोपत्री मान्यता दिली आहे. परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने समाजातील वाईट प्रवृत्तीवरती अंकुश लावताना अडचणी निर्माण होत असल्याचे दिसत आहे. सदरील आरोपींना जामीन मंजूर करण्यात येवू नये, या करिता पोलीस यंत्रणेणे सक्षम आणि कोणत्याही त्रुटीशिवाय तपास करुन कडक कलम लावणे गरजेचे आहे. जेणे करुन समाजामध्ये अशा प्रकारचे वाईट कृत्य करण्याचे धाडस कोणीही करु शकणार नाही. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करुन कडक कायद्याची अंमलबजावणी करण्यात याची. व पिडीत मुलीला व त्यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हाध्यक्ष अंजलीताई बेताळे, भा.ज.महिला जि. उपाध्यक्ष पुजा राठोड, भाजपा युवती जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाढे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस आशाताई लांडगे, भा.ज.महिला जिल्हा सरचिटणीस रुपालीताई घाडगे, दिपज्योती आकोसकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
 
Top