Views


*मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी अँड हाई स्कूल, खाजा नगर, उस्मानाबाद. येथे "जागतिक महिला दिन" साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी अँड हाई स्कूल, खाजा नगर, उस्मानाबाद. येथे "जागतिक महिला दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यू.इंजि.कु.सायली माने मॅडम (जल संपदा विभाग उस्मानाबाद) उपास्थित होत्या. तर प्रमुख म्हणून हाफीज अग्रो लि.चे अध्यक्ष अलिमोद्दिन काझी, माईंड पॉवर ट्रेनर इफ्तेखार पटेल उपस्थित होते. शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीत निवड झालेले महिला विद्यार्थींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना अलिमोदिन यांनी करून शाळे विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक आसिया मॅडम (माध्यमिक), मुख्याध्यापक मोहम्मदी मॅडम (प्राथमिक), शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शालेय परिसरातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद अझर यांनी केले तर आभार अहमद सर यांनी मानले.
 
Top