Views
*भारतीय जनता पार्टी तर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा साठी भाजपा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्राचे गृह मंत्री श्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने
=========================मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये खंडणी वसुली करून देण्याच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे गृह खाते बदनाम होत असून गृहमंत्र्यानी तात्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे या मागणीसाठी दि.21 मार्च 2021 रोजी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टिच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी गृहमंत्री देशमुख राजीनामा द्या ... गृहमंत्री देशमुख हाय... हाय ... उद्धव ठाकरे सरकार हाय... हाय ... महाविकास आघाडी सरकार हाय... हाय ... या घोषणा संतप्त भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्या .उस्मानाबाद भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृतवाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी गृहमंत्र्यानी पोलीस खाते खंडणी मागून बदनाम केले असल्याचा आरोप करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे, या विषयात राष्ट्रवादी कौंग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी करावी, अशी मागणी नितीन काळे यांनी केली. ठाकरे सरकार ने महाराष्ट्रातील पोलिसांची बदनामी केली असून या सरकारला महाराष्ट्रातील 11 कोटी जनता प्रत्येकी १० रुपये असे गोळा करून दरमहा 180 कोटी देईल परंतु जनतेचे रक्षणकर्ते पोलिसांना बदनाम करू नये अशी टीका केली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. खंडेराव चौरे,भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भा.ज.यु.मो. जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेंनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके, बालाजी कोरे, प्रवीण पाठक, नामदेव नायकल,संतोष क्षीरसागर, गिरीश पानसरे, शीतल बेदमूथा,सूरज शेरकर, गणेश इंगळगी,प्रसाद मुंडे, अक्षय भालेराव,श्रीराम मुंबरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top