Views
*पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई व्हटकर यांचे कार्य कौतुकास्पद ----- आमदार चौगुले, शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई किशोर व्हटकर यांच्या प्रयत्नातून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 16 मुलींसाठी मंजूर झालेल्या सायकलींचे आ.ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्या सौ. क्रांतीताई व्हटकर होत्या. यावेळी प्रमुख म्हणून उमरगा बाजार समितीचे सभापती एम.ए.सुलतान, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, उपतालुकाप्रमुख शेखर मुदकन्ना, विद्यार्थीसेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, गुंजोटीच्या सरपंच सौ.सरस्वती कारे, उपसरपंच आयुब मुजावर, गुंजोटी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन बलभीमराव शाईवाले, मायक्रोकॉमचे संचालक प्रा.युसूफ मुल्ला, उमरगा महिला व बालकल्याणच्या पर्यवेक्षिका मंजुषा कुलकर्णी, माजी सरपंच शंकरराव पाटील, सहदेव गायकवाड, प्रदीप शिवनेचारी, ग्रा.पं. सदस्या विजया चव्हाण, स्नेहा पाटील, कौसल्या बेळमकर, जयश्रीताई कलशेट्टी, सुनीता जेटीथोर, श्रीनिवास हिरवे, रवी देशमुख, योगेश शिंदे, शेषेराव खंडागळे, अदि, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना सचिव उस्मान सय्यद, विजय स्वामी, सतीश कारे, हुसेन पीरजादे, आकाश शिंदे, राजेंद्र कटकधोंड, तुळशीराम कटकधोंड, जटिंगा इंगळे, राम कटकधोंड, नंदकिशोर खमीतकर, शेखर कटकधोंड, विवेक व्हटकर, विशाल व्हटकर, अनवर पठाण, अल्ताफ पठाण, रज्जाक शेख यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे दशरथ देवकते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या विद्यार्थिनींना मिळाला सायकलीचा लाभ -- आरती जोगे, अनुराधा सूर्यवंशी, वैष्णवी जोगे, मुक्ताबाई काळे, स्नेहा जोगे, लक्ष्मी कोकरे, काजल लवटे, प्रणिता लवटे, योगिता लवटे, दीपाली व्हनमाने, लक्ष्मी घोडके, निकिता चौधरी, साक्षी गायकवाड, अंजली दूधभाते, प्रतीक्षा गायकवाड, आरती म्हेत्रे.
 
Top