Views
*तुरीरी येथे शांतीदूत परिवार व व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर, रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील विठ्ठल बाबा महाराज मठात शांतीदूत परिवार व तुरोरी व्यापारी महासंघाच्या वतीने बुधवारी दि.24 मार्च 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी परिवाराचे मार्गदर्शक सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे मुख्य सल्लागार अशोक कारभारी जाधव होते. तर प्रमुख म्हणून मुख्य सल्लागार प्रशांत पाटील, अध्यक्ष अभिजित जाधव-माडीवाले, सरपंच मयुरी जाधव उपसरपंच तुकाराम जाधव, डॉक्टर विजयकुमार शिंदे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत जाधव, 
. शिल्पा सपली, पूजा माणिकवार, सीमा पाटील, उपाध्यक्ष बालाजी जाधव, जगन्नाथ माने, माजी सरपंच माधव जाधव त्याचबरोबर शिवसेनेचे शाखाप्रमुख विजयकुमार भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे, संजय जाधव, शरद पाटील, उमेश जाधव, आदि, उपस्थित होते. यावेळी महिलांनी सुद्धा रक्तदानामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केले. उपस्थिती होते. विशेष म्हणजे विठ्ठलराव जाधव यांनी 61 व्या वर्षी 81 व्या वेळी रक्तदान केले. यावेळी शांतीदूत परिवाराच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यासाठी रक्तपेढीचे डॉ.सागर पतंगे, शांतीदूत परिवारचे मराठवाडा प्रमुख प्रा.जीवन जाधव, सचिव गणेश गरूड, प्रदेश सरचिटणीस प्रा.युसुफ मुल्ला यांनी पुढाकार घेतला. तुरोरी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यापारी महासंघाचे सचिव बालाजी माणिकवार यांनी केले.
 
Top