Views


*6700 रुपये लाच घेणाऱ्या कळंबच्या महिला नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात....*

*उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)*

उस्मानाबाद 6693 रुपयांची लाच मागणी करून 6700 रुपये लाच रक्कम स्विकारल्याने एका नायब तहसीलदार (पुरवठा) यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद पथकाने ताब्यात घेतले आहे. 
तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकानदार असून तक्रारदार यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले होते त्याचे प्रत्येकी एक क्यूँटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. तक्रारदार यांचे मागील तीन महिन्याचे 44623 /- रुपये बिल काढून देण्यासाठी 1)श्रीरंग साधू डोंगरे, वय 64 वर्ष, स्वस्त धान्य दुकानदार व अधक्ष्य, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना रा. कोथळा, तालुका कळंब 2). श्री विलास ज्ञानोबा पिंगळे, वय 55 वर्ष, स्वस्त धान्य दुकानदार, राहणार पाथर्डी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद.3) श्रीमती परविन उमर दराज खान पठाण, वय 47 वर्ष, नायब तहसीलदार (पुरवठा ) तहसील कार्यालय, कळंब तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांना बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के 6693 रुपये लाचेची मागणी करून आरोपी क्रमांक 1) डोंगरे यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष स्वीकारले याबाबत पो स्टे कळंब , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबादयांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, विशाल डोके , अविनाश आचार्य, अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर चालक तत्तात्रय करडे यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पो. नि, ला. प्र. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) यांनी केले आहे.
 
Top