Views


*लोहारा शहरात भाजपा तालुका बुथप्रमुखाची बैठक व भाजपा नुतन तालुका कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरात भाजपा तालुका बुथ प्रमुखाच्या कार्यकर्त्यांची बैठक व भाजपा नुतन तालुका कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम दि.19 मार्च 2021 रोजी घेण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.अनिल काळे यांनी बुथ रचने बाबत कार्यकर्त्यांकडुन आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, पं.स.सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, नेताजी शिंदे, हिराजी बुवा, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम साठे, अजित ढोणे, शंकरअप्पा मुळे, प्रमोद पोतदार, 
कमलाकर शिरसाट, आदि, उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.अनिल काळे यांच्या हस्ते भाजपा लोहारा तालुका नुतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देऊन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयेश सुर्यवंशी, बालाजी चव्हाण, मिलिंद सोनकांबळे, काशीनाथ घोडके, बाबुराव घाडगे, सुधाकर दंडगुले, रविराज कारभारी, सुरेंद्र काळप्पा, गहिनाथ कागे, गौरव गोस्वा, सकलेन शेख, सिद्रामप्पा नरुणे, परमेश्वर माशाळकर, मल्लिनाथ फावडे, उदय कुलकर्णी, शिवाजी दंडगुले, श्रीशैल्य बिराजदार, प्रतिक गोसावी, अजय गोसावी, महेश गिरी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top