Views




*रुपामाता ॲग्रोटेक प्रा.लि. पाडोळी (आ) येथे रुपामाता सॉलिड जागरी कारखान्याचे उद्घाटन व रुपामाता नॅचरल शुगर्सच्या 5,02 , 501व्या गुळ पावडर पोत्याचे पूजन भारतीय जनता पार्टीचे औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद तालुक्यातील रुपामाता ॲग्रोटेक प्रा.लि. पाडोळी (आ) येथे दि.(19) मार्च रोजी रुपामाता सॉलिड जागरी कारखान्याचे उद्घाटन व रुपामाता नॅचरल शुगर्सच्या 5,02 ,501व्या गुळ पावडर पोत्याचे पूजन भारतीय जनता पार्टीचे औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार व रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड.व्यंकट गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य सुधाकर गुंड, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, बालाजी बंडगर, बाबासाहेब पाटील, रामराव जंगाले, नागेश मुंगळे, नारायण नन्नवरे, ॲड.अजित गुंड, सुरेश मनसुळे, भरत गुंड, उपसरपंच बाबुराव पुजारी, ॲड.शरद गुंड, आदि उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, मागास असलेल्या जिल्ह्यातील पाडोळी सारख्या खेड्यात उद्योग समूहाला भरारी देण्याचे व येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी देऊन युवा पिढीच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम ॲड.व्यंकट गुंड यांनी केले. भविष्यकाळात त्यांना उद्योग निर्मितीसाठी कसलीही गरज पडल्यास त्यांना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी गावातील नागरिक व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.व्यंकट गुंड व सूत्रसंचालन बापू शेख सर यांनी केले तर आभार ॲड. अजित गुंड यांनी मानले.
 
Top