Views

*क्रांतीकारी सामाजिक संस्थेच्या वतीने हंद्राळ येथे गरजु महिलांना किराणा किटचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
उमरगा तालुक्यातील हंद्राळ येथे 250 गरजु महिलांना क्रांतीकारी सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक भावना जपत किराणा किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शहाजी कुंभार होते. तर प्रमुख म्हणून क्रांतीकारी सामाजिक संस्थेच्या सचिव बालिका इंगळे, उपसरपंच महानंदा तांबाळे, प्रथम संस्थेचे सुमित कोथिंबिरे, रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला, माजी सरपंच रमेश हत्तरगे, सामाजिक कार्यकर्त्या छाया बडूरे, ज्योती कुंभार वनिता गायकवाड गजेंद्र इंगळे अतुल भोसले, आदीं उपस्थिती होते. कोणत्याही आपत्तीसाठी सर्वांच्या मदतीला सामाजीक संस्था नेहमीच मदतीला येत असतात. कोरोना सारख्या आजारामुळे देशासमोर मोठे संकंट उभे टाकले आहे. यामुळे गोरगरीबांचा रोजगार हिरावुन घेतला आहे. अशा संकटकाळी आम्ही कायमच तुमच्या पाठीशी असल्याचे मत क्रांतीकारी सामाजिक संस्थेच्या सचिव बालिका इंगळे यांनी यावेळी व्यक्त केले. 
यावेळी प्रा.मुल्ला, कोथींबीरे, हत्तरगे यांची भाषणे झाली. यावेळी गावातील बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
 
Top