Views


*लोहारा शहरातील डांबरीकरण व सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी केली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लोहारा शहरात डांबरीकरण व सिमेंट रस्त्याच्या
विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. रस्ते नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. हि कामे सुरू झाल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील प्रभाग क्रं.8 व 9 मधील रजीस्ट्री ऑफिस ते आझाद चौक पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम सुरुवात सुरु झाले आहे. व तसेच प्रभाग क्रं.8 मध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. दि.15 मार्च 2021 रोजी शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी नगर परिषदचे शिवसेना गटनेते नगरसेवक अभिमान खराडे उपस्थित होते.
 
Top