Views


*माझे गाव स्वच्छ गाव सुंदर गाव या योजने अंतर्गत ग्रामपंचायत बोर्डा येथे कचरा गाडीचे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या हस्ते लोकार्पण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

*माझे गाव स्वच्छ गाव सुंदर गाव*
या योजने अंतर्गत कळंब तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्डा ग्रामपंचायत येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. व तसेच ग्रामपंचायत बोर्डा यांच्यावतीने गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा कळंब तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, माजी पं.स.सभापती दत्तात्रय साळुंके, जि.प.सदस्य सुरेश कोरे, अरुण काका चौधरी, मकरंद पाटील, मनोहर शेळके, सरपंच सौ.आशा व्यंकट शेळके, उपसरपंच युवा नेते राहुल चव्हाण, व्यंकट शेळके, चंद्रकांत शेळके, मधुकर शेळके, हरिश्चंद्र शेळके, सुनिल पारेकर, सायाजी मासाळ, सोमनाथ सुरवसे, अनिल काळे, कमलाकरशेळके, अरुण मासाळ, रंजित चंदनशिवे, गणेश जावळे, सिद्देशराजे भोसले, आदि, उपस्थित होते. या कचरा गाडीमुळे गाव स्वच्छ राहणार असून, गावच्या प्रगतीस मोठा हातभार लागणार असल्याचे नितीन काळे यांनी सांगितले, तसेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करता येते असेही त्यांनी सांगितले. आ.सुजितसिंह ठाकुर, आ. राणाजगजीतसिंह पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात कळंब तालुक्यात अनेक उपाय योजना व विकासात्मक दृष्टिकोण ठेऊन काम करण्याचे विचार बैठकीत मांडले. यावेळी आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top