Views


*शेतकऱ्यांच्या पंपाची विज तोडू नका - रामदास कोळगे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 शेतकऱ्यांच्या शेतातील पंपाची विज कापून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना अजून अडचणीत आणू नका असे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी रुईभर येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या समर्थ बुथ सशक्त बुथ या अभियानाच्या निमित्ताने व्यक्त केले. कोळगे पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे सरकार जुलमी पध्दतीने शेतक यांचे डी.पी. बंद करुन सक्तीची वसुली करत आहे. ज्या शेतक­ऱ्यांचा डी.पी जळाला आहे त्या शेतक­ऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय डी.पी. बसविला जात नाही. शेतक­यांना वेठीस धरुन राज्यसरकार काम करत आहे. मागील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरु केलेल्या अनेक लोकांच्या हिताच्या योजना बंद केल्या असून सरकारमध्ये मेळ नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व थरातील लोकांचे नुकसान होत आहे. असेही शेवटी कोळगे यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र भनगे यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमास माजी उपसरपंच राजाराम कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, राजेंद्र भनगे, किशोर कोळगे, धनंजय चव्हाण, मुकुंद लोमटे, शंकर चव्हाण, शंकर वडवले, नेताजी शेरकर, नागनाथ कोळगे, सोपान घोडके, नवनाथ भनगे, महादेव शिंपले, सुरेश कलाल, पांडूरंग गुरव, नामदेव गुरव, अमित कोळगे, नितीन माळी, नरहरी शिंपले, बापु लोहार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ­
 
Top