Views


*महाराष्ट्रात सर्व बाजूनी संकटात ढकलणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध उस्मानाबाद जिल्हाभरात 20 ते 25 मार्च दरम्यान शक्तिकेंद्र बैठका घेण्याचे ठरले आहे, त्या अनुशंघाने दि.20 मार्च रोजी बैठकांचा शुभारंभ करण्यात आला 75 ते 80 शक्तीकेंद्र बुथ बैठका संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व तुळजापूर विधानसभा सदस्य राणाजगजितसिंह पाटील, आ.सुजीतसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दि. 20 मार्च 2021 रोजी मौजे काजळा व उपळा (मा.) ता. जि.उस्मानाबाद येथे शक्तीकेंद्र, बुथ बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलत असताना नितीन काळे यांनी सांगीतले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना पीक विमा भरुन सुध्दा नुकसान भरपाई किंवा शेतकज्यांचा हक्काचा असलेला पिक विमा मिळाला नाही. सरकारने घातलेली 72 तासांची अट असो किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया अशा जाचक अटीमुळे शेतकज्यांला पिक विमा मिळाला नाही. जिल्हाभरात पिक विम्याचा भरणा हा रु. 580 कोटी झालेला असतांना देखील केवळ रु. 80 कोटी वितरीत करुन बाकीचे रु. 500 कोटी नेमके कोणाच्या घश्यात गेले. असाही प्रश्न यावेळी काळे यांनी उपस्थित केला. तसेच कोरोणाच्या संकटामुळे अगोदरच आर्थीक अडचणीत सापडलेला शेतकरी असेल किंवा सामान्य जनता असेल त्यांना वीज तोडणीच्या नोटीसा पाठवून तात्काळ विज तोडणी चालू केल्यामुळे सर्व सामान्य मानुस हा रस्त्यावर उतरुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश करत आहेत. तसेच राज्यात महिला व अल्पवयीन या सुरक्षीत नाहीत. रोज नवीन अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दिवसें दिवस या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्याचे लफडे उघड होत आहेत. असे असतांना देखील पोलीस प्रशासन या बाबींची गांभिर्याने दखल घेत नाही. आणि गुन्हेगारी प्रवृती असणाऱ्या सचिन वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचे काळे यांनी सांगीतले. सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार हे प्रत्येक विकास कामाचे श्रेय घेत असून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. याचा भारतीय जनता पार्टी जाहीर निषेध करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने दिलेली स्थगीती ओबीसीच्या मनात मंत्र्यांनीच निर्माण केलेली अस्वस्थता असो यामुळे महाविकास आघाडी सरकारचा एकुण बेफिकीर कारभार दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारला जागे करुन काम करण्यास भाग पाडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी सातत्याने रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहे. आणि विधिमंडळात आवाज उठवला आहे. राज्याच्या हितासाठी भाजपाच्या प्रयत्नांना जनतेने साथ द्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुळजापूर विधानसभा सदस्य राणाजगजितसिंह पाटील तसेच आ.सुजीतसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. या बौठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रदिप शिंदे, सोशल मिडियाचे प्रविण पाठक, प्रवीण पाटील, नाना मडके, रामचंद्र कदम, मनोज कदम, सोमनाथ पवार, जगन्नाथ क्षिरसागर, प्रदिप शेळके, राहुल खोचरे, विकास राऊत, चंद्रकांत इंगळे, बप्पा पडवळ, बाबु पडवळ, चिंटू पाटील, अरुण माने, बापू पडवळ, विनायक कुलकर्णी व भाजपाचे पदाधिकारी आणि काजळा व उपळा (मा.) ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top